अडीच कोटींचे अमली पदार्थ जप्त   

मुंबई : नालासोपार्‍यातील मोरेंगाव तलाव येथे एका इमारतीखाली अमली पदार्थांचा चोरटा व्यापार करणार्‍या नायजेरियन आरोपीला बुधवारी दुपारी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २ कोटी ५० लाखांचा १ किलो १२५ ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. अंथोनी ओडिना (वय, ४३) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. वसई विरार शहरात छुप्या मार्गाने अमली पदार्थांचा चोरटा व्यापार होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बुधवारी सकाळी मोरेंगाव तलाव परिसरातील प्रियंका बिल्डिंगजवळ एकजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती तुळींज पोलिसांना मिळाली होती. 

Related Articles